पटवांची हवेली जैसलमेर

मंगळवार, 7 जानेवारी 2025 (07:30 IST)
India Tourism : भारतातील राजस्थानातील प्रत्येक शहर हे जागतिक स्तरावर देखील आपल्या ऐतिहासिक वास्तूंसाठी म्हणजेच किल्ले, राजवाडे, वास्तू आणि हवेलीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच राजस्थानमधील मध्ययुगीन काळात बांधलेल्या हजारो इमारती प्रसिद्ध असून या ऐतिहासिक राज्यातील हे सर्व किल्ले, वास्तू, वाडे  पाहण्यासाठी अनेक पर्यटक राजस्थानमध्ये दाखल होतात. तसेच राजस्थानचे जैसलमेर हे अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. तसेच जैसलमेर मधील 'पटवांची हवेली'ही हवेली राजस्थानचे प्रमुख पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. असे म्हटले जाते की हवेलीची रचना करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागली होती. तुम्ही देखील जैसलमेरला भेट देणार असाल तर या अद्भुत अश्या पटवांची हवेलीला नक्कीच भेट द्या.

पटवांची हवेली इतिहास-
जैसलमेरमध्ये असलेला हा ऐतिहासिक वाडा सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक आहे. ही हवेली पाच वाड्यांचा समूह आहे जी एका श्रीमंत उद्योगपती 'पटवा'ने यांनी बांधली होती. असे म्हणतात की त्या व्यावसायिकाला पाच मुले होते आणि त्या पाच पुत्रांपैकी प्रत्येकासाठी प्रत्येक वाडा बांधला होता. या हवेलीची रचना करायला तीस वर्षे लागली.

हवेली वास्तुकला-
या हवेलीची वास्तू अतिशय अप्रतिम आहे. विशेष म्हणजे याच्या भिंतीवर आरशाचे काम करण्यात आले आहे. भिंतींवर उत्कृष्ट चित्रे आणि सुरेख नक्षीकाम आहे. तसेच 60 पेक्षा अधिक बाल्कनींमध्ये असलेल्या खांबांवर विविध चित्रे आहे. या हवेलीचा जवळजवळ प्रत्येक दरवाजा अतिशय सुंदर आहे जे स्थापत्यशास्त्राचे काम आहे. झरोका, कमानी, बाल्कनी आणि प्रवेशद्वार देखील सुंदर असे कोरीवकाम आणि चित्रे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती