
मकर-विवाह व वैवाहीक जीवन
मकर राशिच्या लोकांसाठी वृषभ, कन्या व मकर राशीच्या व्यक्ती आपल्यासाठी योग्य जीवनसाथी ठरतात. या लोकांच्या दृष्टीने विवाह हा सुरक्षा तसेच एकतेचे प्रतिक आहे. ते जीवनात आनंद देणारी प्रसंन्नता आणणारी जीवनसाथी शोधत असतात. विवाह व प्रेम हेच यांच्यासाठी जीवनाप्रमाणे आहे. यांच्या जीवनात आपला जीवनसाथी व मित्रांसाठी महत्वपूर्ण स्थान आहे. यांना बायको कार्यकुशल व चतुर मिळते. यामुळे संसारीक जीवन सुखी होते. घराची पूर्ण जवाबदारी त्यांची पत्नी संभाळते. हे लोक आरामात जीवन जगतात.