मकर-स्वाभाविक वैशिष्ठे
या राशिचे लोक हे संयमी, प्रामाणिक व स्वनियंत्रणात कुशल असतात. कधी कधी हे लोक स्वकेंद्रीत व हटवादी बनतात. हे घाबरट निष्ठूर निराशवादी शुष्क स्वभावाचे ह्रदयहीन असतात. दुसर्यांच्या जीवावर यांना जीवन जगायला आवडते. हे आत्मकेंद्रीत पण पुढचा विचार करणारे असतात. मात्र जीवानाच्या उत्तरार्धात ते दुसर्यांचा विचार करणारे कष्टाळू विश्वसनीय बनतात. एक जवाबदार नागरिकाप्रमाणे ते वागतात.