
कर्क-विवाह व वैवाहीक जीवन
कर्क राशिच्या लोकांनी आपल्याच राशिच्या व्यक्तीशी विवाह करावा. या राशिचे लोकांना स्वतंत्र राहणे अधिक आवडते. पत्नीच्या हाताखाली राहायला वा तिला चांगले वाटेल म्हणुन काही करायचे असे करणे यांना अजीबात आवडत नाही. त्यांचा जीवनसाथीने त्यांच्या कामात हस्तक्षप केलेला त्यांना आवडत नाही. हे फार हट्टी स्वभावाचे असतात. त्यामुळे यांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. व्यर्थ बडबळ त्यांना आवडत नाही ते आपल्या पत्नीला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. प्रामाणिक असल्यामुळे पैसे साठवू शकत नाही. वृश्चिक किंवा मीन राशिंच्या व्यक्तीशी विवाह करणे यांच्यासाठी फायद्याचे राहील.