
कर्क-भाग्यशाली रत्न
कर्क राशिच्या लोकांचे भाग्याशाली रत्न मोती आहे. यांचा चंद्र खराब असल्यावर मोती घातला पाहिजे. सोमवारच्या दिवशी चांदीच्या अंगठीमध्ये 4 किंवा 6 रत्तीचा खरा मोती किंवा 8-10 रत्तीचा चंद्रमणि तर्जनी बोटात घालून चंद्रदेवाची पुजा करावी. असे करणे शुभ व लाभदायक आहे. यांच्यासाठी पुष्पराज मणिपण लाभकारी आहे. जर यांचा मंगळही खराब असेल तर या राशिच्या लोकांनी पोवळे घातले पाहिजे. पश्चिमात्य संस्कृतीतही कर्क राशिच्या लोक पन्ना घालणेही फलदायी मानतात.