कुंभ-व्यक्तिमत्व
कुंभ रास ही शनीची रास आहे. कुंभ ही वायुतत्वाची रास आहे. शुद्र हा कुंभ राशीचा वर्ण आहे. कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्राची अंतिम दोन चरणे, शततारका आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राची पहिली तीन चरणे अंतर्भूत होतात. हातात घट घेतलेला पुरुष हे कुंभ राशीचे चिन्ह आहे. पाण्याने भरलेली भांडी, पाणवठे, ही कुंभ राशीची निवासस्थाने आहेत. जलाशयातील फुले, कमळ यावर कुंभ राशीचा अंमल असतो. कुंभ राशीचा रंग मुंगुसवर्णी असतो. ज्या लोकांचेनाव गु, गे, गो, सा, सी, स, से, सो, सा अक्षरांपासून सुरु होते यांची कुंभ रास असते. या राशीचे लोक प्रेमळ व भाविनक असतात. कुंभ राशीची माणसं काहीशी सडपातळ आणि उंचपुरी असतात. कपाळ दोन्ही बाजूंनी निमुळते असते. ह्या व्यक्तींना भिन्नलिंगी व्यक्तींविषयी अधिक आकर्षण असते. ही माणसं अत्यंत बुद्धिमान असतात. कुंभ राशीला बुध-शुक्राची जोरदार शुभ फळं मिळतात तर रवि-मंगळ अशुभ ठरतात

राशि फलादेश