विठू विठू साद आली असें कानी,
दिंड्या, टाळा चा गजर निनादे अंबरी,
दारी माझी तुळस,आली बहरून,
मंजिऱ्याची माळ ,झाली की करून,
सावळे रूप तुझें देवा भरले नयनी,
आळवू कसं तुला? हाच प्रश मनी,
यावं यावं वाटे दर्शना सी तुझ्या हरी,
पर हिचं इच्छा मनी, तू द्यावं दर्शन घरी!
एवढी पुण्याई माझी नाही खरी देवा,
नाम तुझं घ्याया, बुद्धी तशी द्या बा!!