महाराष्ट्राच्या भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. हे संपूर्ण हिंदुस्थानातील एकमेव असे मंदिर असणार आहे.छत्रपती शिवाजी राजेंचे मोठे भक्त साईराम आणि त्यांचे भाऊ राज चौधरी यांनी हे पुण्य कार्य आपल्या हाती घेतले असून त्यांनी स्वतःचं मालकीची तब्बल दीड एकर पेक्षा जास्त जमीन या मंदिरासाठी अर्पण केली आहे.त्यांच्या सह गावातील मंडळी देखील या पुण्य कार्यासाठी हातभार लावत आहे.आणि मंदिराच्या कार्याला सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवरायांच्या मंदिर उभारण्याचे हे पावन कार्य भिवंडीच्या शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी गेल्या 2 वर्षा पासून कोरोना कालावधीच्या सर्व अडचणीवर मात केले असून चौधरी बंधूंनी उभारलेल्या या मंदिराचे 80 टक्के बांधकार्य पूर्ण केले आहे.या मंदिराची उंची 55 फूट आहे.या मंदिराला शिवकालीन गडकिल्याचे रूप येण्यासाठी 36 फूट उंचीचे प्रवेश द्वार तयार केले आहे.