केंद्राकडे जीएसटीची तीस हजार कोटींची थकबाकी

बुधवार, 7 जुलै 2021 (09:17 IST)
राज्य सरकारची केंद्राकडे वस्तू व सेवा कराची (जीएसटी) ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले. जीएसटीसंदर्भातील एका विधेयकावरील चर्चेदरम्यान शरद रणपिसे यांनी थकबाकीबाबत विचारणा केली होती.
 
त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे आधीची एक हजार २९ कोटी रुपये, गेल्या आर्थिक वर्षांतील २० हजार १९३ कोटी रुपये आणि चालू आर्थिक वर्षांतील नऊ हजार १३० कोटी रुपये अशी एकूण ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषद असून प्रत्येक राज्याच्या अर्थमंत्र्यांचा त्यात समावेश आहे. परिषदेच्या नियमित बैठका होतात व निर्णय घेतले जातात. त्यातील निर्णयानुसार सुसूत्रतेच्या अनुषंगाने काही सुधारणा या विधेयकाद्वारे करण्यात येत आहेत, असे पवार यांनी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती