भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची प्रभावी कामगिरी सुरूच आहे आणि त्यांनी बेल्जियमविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवला आहे. युरोपच्या सध्याच्या दौऱ्यावर भारतीय संघाने बेल्जियमचा 3-2 असा पराभव केला. सोनमने चौथ्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर, लालथंतुलंगी (32वे मिनिट) आणि कनिका सिवाच (51 वे मिनिट) यांनी भारताकडून गोल केले.
बेल्जियमकडून 37 व्या आणि 40 व्या मिनिटाला सलग गोल करून सामना बरोबरीत आणला. बेल्जियमकडून मेरी गोएन्सने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला तर मार्टे मेरीने फील्ड गोलवर गोल केला. खेळ संपण्यास नऊ मिनिटे शिल्लक असताना, कनिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची विजयी मालिका सुरू ठेवली. भारताचा पुढील सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.