भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू सुमित नागलची खराब कामगिरी सुरूच असून त्याला एटीपी चॅलेंजर सर्किट टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. सहाव्या मानांकित नागलला या क्ले कोर्ट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या बिगरमानांकित खेळाडू जेफ्री ब्लँकेनॉक्सविरुद्ध 4-6, 6-7 असा पराभव पत्करावा लागला.