विम्बल्डनच्या यजमान ऑल इंग्लंड क्लबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ग्रँड स्लॅम स्पर्धेची बक्षीस रक्कम विक्रमी 53.5 दशलक्ष पौंड (सुमारे 6.23 अब्ज रुपये) पर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यापैकी एकेरी श्रेणीतील विजेत्यांना तीन दशलक्ष पौंड (सुमारे 34.93 कोटी रुपये) मिळतील. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा सात टक्के आणि 3.5 दशलक्ष पौंड जास्त आहे.
" या वर्षीच्या पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना गेल्या वर्षीच्या बक्षिसांपेक्षा 11.1 टक्के जास्त रक्कम मिळेल. एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंना 66,000 पौंड (सुमारे 76 लाख रुपये) मिळतील, जे गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्के जास्त आहे. वर्षातील तिसरा ग्रँड स्लॅम, विम्बल्डन, 30 जून रोजी सुरू होईल आणि 13 जुलै रोजी संपेल.