पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या

शुक्रवार, 28 जून 2024 (21:33 IST)
नागपुरात एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा लोखंडी रॉडने वार करून खून केला. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह ताब्यात घेतले शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला.पोलिसांनी आरोपी पती दलप्रीतला शोधून अटक केली आहे.तर मन्नत कौर असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला आणि आरोपीचा 5 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला असून त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दलप्रीतचे कुटुंबीय त्यांच्या लग्नावर खुश नव्हते त्यामुळे कुटुंबात सततचे वाद होत होते. आरोपीचे कार डेकोरेशनचे दुकान आहे. 

आरोपीला मद्यपानाचे व्यसन जडले होते. तो कर्जबाजारी होता. दरम्यान त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नी चे जिम ट्रेनरशी अवैध संबंध असल्याचा संशय त्याला होता. या वरून दोघांमध्ये वाद होत होते. 
सततच्या भांडणाला आणि वादाला कंटाळून पत्नीने पतीला घटस्फोट देण्याचा विचार केला. आणि माहेरी निघून गेली. पतीच्या सांगण्यावरून ती परत घरी अली आणि काही दिवस राहिली. दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिची हत्या केली. 

या घटनेनन्तर तो तिथून पळून घेला. आणि मन्नतचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.तेव्हा ती त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. नंतर पोलिसांनी आरोपी पतीला शोधून अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती