नागपूर : मद्यधुंद विद्यार्थ्याने फूटपाथवर झोपलेल्यांवर गाडी घातली, दोन ठार, 7 जखमी

मंगळवार, 18 जून 2024 (09:16 IST)
नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर काळाने झडप घातली. नागपूरच्या दिघोरी भागात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर कार घातली. या अपघातात दोनजण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. 
 
रात्री12:40 च्या सुमारास हा अपघात घडला. पीडित हे खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतात आणि फुटपाथवर राहतात. अभियांत्रिकीचा विद्यार्थ्याने मद्यधुंद अवस्थेत आपली कार या कुटुंबावर घातली या अपघातात चार मुलांसह सात जण जखमी झाले आहे तर दोन महिलांचा मृत्यू झाला. 
 
 आरोपी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने कार थेट फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर घातली. या अपघातात एका महिलेचा तिथेच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर आरोपी पळून गेला मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या त्याला पकडले.पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती