महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक घटना समोर आली आहे. नागपूर मध्ये मोबाईवर PUBG खेळता-खेळता एक 16 वर्षीय मुलगा पंप हाऊसमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी त्याच्या वाढदिवस होता, वाढदिवसाचा आनंद दुःखात बदलला असल्याचे सांगण्यात आले आहे.
16 वर्षाचा हा मुलगा ज्याच नाव पुलकित राज आहे. आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर सकाळी मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी निघाला होता. पण दुकान बंद असल्याकारणाने नागपूरमधील अंबाझरी तलावाजवळ गेले. 11 जून ला पुलकितने आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांबरोबर 16 वाढदिवस साजरा केला. रात्री 12 वाजता केक कापल्यानंतर सकाळी 4 वाजता तो आपल्या मित्रांसोबत तलावाजवळ पोहचला.
मोबाईलमध्ये गेम खेळनाय्त तो एवढा मग्न झाला की, चालत असताना तो अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसमध्ये पडला. हे पाहताच त्याचा मित्राने पोलिसांना कळविले. पोलिसांनी पुलकितचा मृतदेह बाहेर काढला. पुलकितने आताच 10 ची परिक्षा पास केली होती. या पुलकितच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब आणि मित्र धक्क्यामध्ये आहे.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हा मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. तर चालतांना तो या पंप हाऊसमध्ये पडला. हा पंप हाऊस कमीतकमी 150 फूट खोल आहे. व त्यात पाणी भरलेले आहे. या मध्ये पडल्याने पुलकीतचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.