अनेक प्रेमप्रकरणे, त्रस्त महिलेने केली आत्महत्या....पती आणि सासर्याला अटक

गुरूवार, 13 जून 2024 (09:51 IST)
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वाईट बातमी घडली आहे. सोलापूरमधील डॉ. ऋचा रुपनवर या महिलेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात या महिलेचा पती सूरज रुपनवर आणि सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपननवर यांना अटक करण्यात अली आहे. 
 
सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी माहिती दिली की, या प्रकरणाबद्दल महिलेच्या भावाने तक्रार नोंदवली. तो म्हणाला की, डॉ. ऋचा रुपनवर ने आत्महत्या केली आहे. आरोप लावला की, तिचा पती वारंवार तिला पैसे मागायचा तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. तसेच मारहाण देखील करायचा. 
 
तसेच महिलेच्या भावाने माहिती दिली की, ऋचाचा पती तिला सारखी धमकी द्यायचा व म्हणायचा की, एमआरआई मशीन घ्यायचे आहे तर पैसे घेऊन ये. तसेच एवढेच नाही तर ऋचाच्या पतीचे बाहेर तीन चार अफेयर होते. तसेच तो म्हणायचा की जर कोणाला सांगितले तर तुला बघून घेईल अशी धमकी द्याच्या. 
 
पोलिसांनी ऋचा रुपनवर या महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून IPC कलम 306, 49B-A, 323, 504, 506 मध्ये एफआईआर नोंदवली आहे. या घटनेची पूर्ण सोलापूरमध्ये चर्चा सुरु आहे. या प्रकरणात ऋचाच्या पतीला आणि सासर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती