नागपूर विमानतळाच्या टॉयलेट मध्ये बॉम्बचा धमकीचा ईमेल

मंगळवार, 25 जून 2024 (17:54 IST)
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल आला आहे. या ईमेल मध्ये टॉयलेट मध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली आहे. 
 
हा ईमेल नागपूर विमानतळाच्या संचालकांना पाठवला असून या प्रकरणी नागपूर पोलीस, सीआयएसएफच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नागपूर विमानतळाची कसून झडती घेतली, मात्र परिसरात काहीही संशयास्पद किंवा बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. सध्या विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) ई-मेलद्वारे 'एरोड्रोम'च्या टॉयलेटच्या पाईपमध्ये बॉम्ब ठेवल्याचा संदेश मिळाला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळ परिसराची कसून झडती घेतली, परंतु त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. 
 
गेल्या दोन महिन्यांत नागपूर विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा ईमेल येण्याची ही चौथी वेळ आहे. 18 जून रोजीही नागपूर विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा बनावट ईमेल आला होता. यासोबतच नागपूर विमानतळावरही एप्रिलमध्ये अशीच बॉम्बची धमकी मिळाली होती आणि कालही धमकीचा ईमेल आला होता, त्यानंतर विमानतळाची झडती घेण्यात आली, मात्र काहीही सापडले नाही. हा ईमेल लॉंग लाईफ बेलॅस्टिन ग्रुप ने पाठवले असून पोलीस सक्रिय झाले आहे. त्यांनी आपली सायबर टीम तैनात केली आहे. 
 
कालही महाराष्ट्रातील नागपूर विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती