मुंबई लोकल ट्रेन स्वप्नांच्या शहराची जीवनरेखा मानली जाते. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. पुढील दोन वर्षांत विरार-डहाणू मार्गावर सात नवीन स्थानके बांधली जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल.
मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC) हा प्रकल्प राबवत आहे आणि तो वेगाने पुढे नेत आहे. वृत्तानुसार, हा प्रकल्प जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे ३,५७८ कोटी इतका आहे, ज्यामध्ये ६४ किलोमीटरच्या विरार-डहाणू विभागाचे चौपटीकरण समाविष्ट आहे.
तसेच विरार-डहाणू मार्ग चौपट करण्याच्या आणि सात नवीन स्थानके बांधण्याच्या प्रकल्पासाठी ३,५७८ कोटी खर्च अपेक्षित आहे. सध्या या मार्गावर फक्त नऊ स्थानके आहे. वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर आणि वाणगाव. वाढत्या प्रवासी वाहतुकीला आणि नवीन थांब्यांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद म्हणून, आणखी सात स्थानके जोडली जात आहे . यामध्ये वाधिवा, सरतोडी, माकुणसर, चिंतुपाडा, पांचाली, वंजारवाडा आणि बीएसईएस कॉलनी यांचा समावेश आहे. अशी माहिती समोर आली आहे.