मुंबईच्या 50 पेक्षा जास्त रुग्णालय, BMC मुख्यालयला बॉंम्ब ने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट

बुधवार, 19 जून 2024 (12:13 IST)
Mumbai Bomb Threat : मुंबईला परत एकदा बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने शहरातील 50 पेक्षा जास्त रुग्णालय, बीएमसी मुख्यालय आणि हिंदुजा कॉलेजला बॉंम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. सध्यातरी पोलिसांना संशयास्पद काहीही आढळले नाही. पण मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा एजंसी अलर्ट मोड वर आहेत.
 
मुंबई पोलीस अधिकरींनी सांगितले की, मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेवन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल सोबत 50 पेक्षा जास्त रुग्णालयांना बॉंम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी विभिन्न परिसरात शोध सुरु केला पण काहीही आढळले नाही.
 
एका अधिकारींनी सांगितले की, सर्व रुग्णालयांना धमकी देणारे ईमेल वीपीएन नेटवर्क व्दारा पाठवण्यात आले. पोलीस साइबर  मदतीने आरोपीची लोकेशन ट्रॅप करण्याचा प्रयत्न करीत आहे. धमकी देणारा ईमेल पाठवण्याचा उद्देश अजून पर्यंत कळलेला नाही. 
 
BMC मुख्यालयला आला धमकीचा ईमेल-
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी)चे मुख्यालयाला देखील धमकीचा ईमेल आला आहे. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने मुख्यालयला बॉंम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पोलीस टीमने बीएमसी मुख्यालयाची चौकशी केली. पण काहीही मिळालेले नाही.या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती