आज अंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिना निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात हजारो लोकांच्या मध्ये योगासने केली. ते म्हणाले, माझे वेळापत्रक कितीही व्यस्त असले तरीही ही दररोज सकाळी 2 तास योगा करतो. ते म्हणाले, आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे.
अनेक मंत्री, खासदार सर्वच विषयावर भाषण देतात पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किती अनुकरण करतात. गातील प्रत्येकाची प्राथमिकता निरोगी शरीर असायला हवी, म्हणून सतत योगासने केली पाहिजेत. जर आपण नियमित योगासने केली तर आपले आरोग्य चांगले राहते. जर आपण नियमित योगासने केली तर औषधे घेण्याची गरज नाही. आमच्याकडून प्रशिक्षित योग शिक्षकही विविध ठिकाणी वर्ग घेतात. योग हे आपल्या तरुणांसाठी रोजगाराचे साधनही ठरू शकते.
नागपुरात जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यशवंत स्टेडियमवर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो योग प्रेमी उपस्थित होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशवंत स्टेडियममध्ये हजारो लोक उपस्थित होते. यामध्ये महिला, पुरुष, युवक आणि एनसीसी कॅडेट्सचा समावेश होता.