देवघर येथील रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

मंगळवार, 29 जुलै 2025 (15:35 IST)
देवघर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात बस चालकासह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल मृतांच्या कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
ALSO READ: कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी बहिणीने एचआयव्ही पॉझिटिव्ह भावाची हत्या केली
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमधील देवघर येथे आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात बस चालकासह 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहे. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रस्ते अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन व्यक्त केले आहे.
ALSO READ: पुणे :आयटी इंजिनिअरने कंपनीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये मागितली वडिलांची माफी
पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. देवघर येथील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "झारखंडमधील देवघर येथील रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये जीव गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून सहानुभूती आहे. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, मी सर्व जखमींच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो."
ALSO READ: लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून खाली ढकलले; पुण्यातील घटना
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती