सध्या हिट अँड रनची प्रकरणे वाढली आहे. नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरणात एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातील काटोल रोड वरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून भरधाव येणाऱ्या ट्रक ने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला चिरडले आहे. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
अश्विन आठवले असे या मुलाचे नाव आहे. अश्विन हा दुचाकीवरून जात असता गोरेवाडा झू परिसरात एका भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात अश्विनचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.