ही योजना गरिबांसाठी तीन वर्षांपासून आनंदाचा शिधा योजना सुरु करण्यात आली असून गरिबांना सणासुदीच्या काळात 100 रुपयात विविध जिन्नस लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात होते. या मध्ये साखर, चणाडाळ, तेल, रवा अशा घटकांचा समावेश होता.
राज्य सरकार हे चार जिन्नस खरेदी करून लाभार्थ्यांसाठी पाठवायचे. योजने अंतर्गत मिळणाऱ्या जिन्नस मध्ये कधी साखर तर कधी तेल उपलब्ध होत न्हवते. वेळीच आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळायचा नसल्याने लाभार्थी शिधा कडे पाठ फिरवू लागले. त्यामुळे आनंदाचा शिधा पाठवू नका असे सांगण्यात आले.
अशी मागणी रास्ता भाव दुकानदार आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून गेल्यावर्षी करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्य सरकारच्या पुरवठा विभागाकडून ही योजना बंद करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. आनंदाचा शिधा कधीच वेळेत वितरणासाठी उपलब्ध होत नव्हता त्यामुळे हा शिधा वितरण करणे दुकानदारांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.