आजपासून महाराष्ट्रात इबॉण्ड प्रणाली सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025 (14:55 IST)
महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची डिजिटल सेवा सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज पासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला असून सादर माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता 24 तास सुरू
आता या निर्णयामुळे कागदी बॉण्डची गरज संपणार आहे. तसेच सीमाशुल्काची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिझिटल होणार आहे. या निर्णयामुळे कागदपत्रे कमी होऊन वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल. 
ALSO READ: केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ६,४१८ कोटी रुपये जारी केले, अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि सीतारमण यांचे आभार मानले
ही प्रणाली पूर्णपणे स्वाक्षरीवर आधारित असेल. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीमुळे व्यवहार सुरक्षित पारदर्शक होईल आणि त्यामुळे फसवणुकीला आळा बसेल. इ बॉण्डची निर्मिती ICEGATE पोर्टलवर होईल. NECL च्या माध्यमातून त्या ई स्टॅम्पिंग आणि इस्वाक्षरी केली जाणार. 
ALSO READ: "महाराष्ट्र संकटात आहे आणि बिहारला पैसे दिले जात आहे," मोदींना निवडणुका दिसत आहे, वेदना नाहीत; उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले
राज्य सरकारने 500 रुपयांची स्टॅम्पड्युटी ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कागदी स्टॅम्प खरेदी करण्याची आवश्यकता नसेल. या निर्णयामुळे कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरण पुरकदृष्टीने ग्रीन गव्हर्नस साठी महत्त्वाचे पाऊल आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती