नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर

सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (16:50 IST)
राज्यात आगामी मिनी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु झाली असून आज नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर केले आहे. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून राज्यातील 67 नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर करण्यात आले आहे.या मध्ये 34 ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. 
ALSO READ: लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, दोन महिन्यांच्या मुदतीमुळे महिलांचा ताण वाढला
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिला संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. 
ALSO READ: राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर
त्या नंतर प्रशासनाने 6 ऑक्टोबर मंत्रालयातील परिषद सभागृहात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. 
ALSO READ: फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी शिर्डी येथे अमित शहा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली
राज्यातील 32 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.  प्रारूप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती