Nashik News : नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करत नाशिकमधील त्यांच्या दोन कार्यक्रमांची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी प्रत्येक नवीन वर्षात माझ्या कुटुंबासह आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतो. हे नवीन वर्ष शेतकऱ्यांना समर्पित आहे. मी शेतकऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पीक विमा योजने अंतर्गत भरून काढले जाईल. शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळावीत यासाठी शासनाने अनुदान दिले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित आहे. 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट किसान सन्मान निधी जमा करणारे मोदी सरकार आहे.