ईडीचे मुंबई आणि अहमदाबाद मध्ये 7 ठिकाणी छापे, कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त

शनिवार, 7 डिसेंबर 2024 (08:55 IST)
Maharashtra News: ईडीने महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये मोठी कारवाई केली असून त्यात कोट्यवधींची रक्कम जप्त केली आहे. ईडी ने शुक्रवारी अहमदाबाद आणि मुंबईतील सात ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि या ठिकाणांहून 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
ALSO READ: मंत्रिमंडळ विस्तार वर फॉर्म्युला ठरला म्हणाले देवेंद्र फडणवीस, पवार आणि शिंदे आमदारांना दिलेले आश्वासन कसे पूर्ण करणार?
मिळालेल्या माहितीनुसार ईडीने जप्त केलेली ही रोकड नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मालेगावच्या प्रकरणाशी संबंधित आहे. याची माहिती मिळताच, ईडीच्या मुंबई झोनने शोध मोहीम सुरू केली आणि मुंबई आणि अहमदाबादमधील सात ठिकाणी छापे टाकले, तेथून ईडीने 13.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.   “पुढे, वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या खात्यांमधून शेकडो कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम काढण्यात आली आणि काढलेली रोकड अहमदाबाद, मुंबई आणि सुरत येथील अंगडिया आणि हवाला ऑपरेटर्सना वितरित करण्यात आली.” आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती