मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आणि त्याच्या मुलाने आपल्या शेजाऱ्याची हत्या केली. यानंतर त्यांनी मृताचे छिन्नविछिन्न शीर घेऊन गावात फिरून स्थानिक पोलीस स्टेशन गाठले. यामुळे पोलिसही हैराण झाले होते. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. गुरुवारी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात बुधवारी सकाळी एका व्यक्तीने आपल्या मुलासह शेजाऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर मृताचे छिन्नविछिन्न शीर घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या मुलाला ताब्यात घेतले.