मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला तेव्हा घरात एलपीजी गॅस भरला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता भूषण जग्गी आणि जितेंद्र अशी मृतांची नावे आहे. नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी चारच्या सुमारास पीडितांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले, पण घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. वारंवार ठोठावल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.