मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत मंत्री शेलार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अधिकाधिक उद्योग व व्यवसाय निर्माण होतील. यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राला प्रभावीपणे स्पर्धा करता येणार आहे. यावेळी आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुतिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच विभागाचा आढावा घेऊन पुढील वाटचालीबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्र या क्षेत्रात अग्रेसर झाला पाहिजे. AI चा प्रभावीपणे वापर करून, आम्ही अधिक उद्योग आणि व्यवसाय आकर्षित करू शकतो आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. असे देखील ते म्हणाले.