गृहमंत्री शाह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये आज १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, २७ जणांनी काल आत्मसमर्पण केले होते. महाराष्ट्रातही काल शस्त्रे सोडून देऊन ६१ नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण २५८ डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे.
नक्षलवाद्यांबद्दलचे आमचे धोरण स्पष्ट आहे
जे आत्मसमर्पण करू इच्छितात त्यांचे स्वागत आहे, परंतु जे शस्त्रे हाती घेत राहतील त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. मी सर्व नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचे आवाहन करतो.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, एकेकाळी दहशतवादाचे केंद्र असलेल्या छत्तीसगडमधील अबुझहमद आणि उत्तर बस्तर आज पूर्णपणे नक्षलवादी हिंसाचारमुक्त घोषित करण्यात आले आहे ही खूप आनंदाची बाब आहे. जानेवारी २०२४ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यापासून, २,१०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.