मिळालेल्या माहितीनुसार चकमक अजूनही सुरू आहे, त्यामुळे ही संख्या वाढू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्षलविरोधी कारवाईदरम्यान मैनपूर पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात ही चकमक सुरू झाली. सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोंनी नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत छत्तीसगड पोलिसांचाही सहभाग आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, "स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), कोब्रा (सीआरपीएफची एक विशेष युनिट - रिझोल्यूट अॅक्शनसाठी कमांडो बटालियन) आणि इतर राज्य पोलिस युनिट्स या कारवाईत सहभागी आहे. अधूनमधून गोळीबार अजूनही सुरू आहे. सीसी सदस्य मदेम्बलकृष्ण उर्फ बालन्ना उर्फ रामचंद्र उर्फ राजेंद्र उर्फ गोलकोंडा राजेंद्र उर्फ चिन्नी उर्फ मनोज हा चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आहे आणि तो ५८ वर्षांचा आहे. बालकृष्ण हा तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. वृत्तानुसार, त्याच्यावर १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.