तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

सोमवार, 23 डिसेंबर 2024 (21:31 IST)
नाशिकच्या शिरवाडे वणी येथे एक तरुण फसवणुकीला बळी पड़ला आणि त्याच्या अकाउंट मधून साडेचार लाख रुपये सायबर चोरट्यानी काढून घेतले. 

तरुणाला एका नामांकित कंपनीकडून त्याच्या मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड निष्क्रिय झाल्याचा संदेश आला. मेसेजमध्ये त्याचा नंबर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी रिप्लाय देण्यास सांगितले. तरुणाने रिप्लाय देण्यात ओटीपी देण्यात आला आणि पाहता पाहता खात्यातून पैसे काढण्यात आले.कोंडाजी निफाडे असे या तरुणाचे नाव आहे. 

सदर घटना गेल्या आठवड्याची आहे. कोंडाजी निफाडे यांचा  मोबाईल क्रमांक अचानक निष्क्रिय झाला त्याच दिवशी त्यांना एका क्रमांक वरुन फोन आला तो कंपनीचा असल्याचा दावा करून त्याने मोबाईलवर पाठवलेला चार अंकी कोड न दिल्यास त्याचा मोबाईल क्रमांक कायमचा निष्क्रिय होईल, असे सांगितले.
निफाडे यांनी दोनदा ओटीपी दिला, मात्र त्यांचा मोबाईल क्रमांक निष्क्रिय राहिला. दुसऱ्या दिवशी, पिंपळगाव बसवंत येथील निफाडे यांच्या IDBI बँक खात्यातून 
₹94,000 ट्रान्सफर करण्यात आले. याव्यतिरिक्त, पिंपळगाव बी मधील त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यांमधून ₹3,70,080 ट्रान्सफर करण्यात आले, जे दोन दिवसांत एकूण सुमारे ₹4.64 लाख झाले. या संपूर्ण कालावधीत निफाडेचे मोबाइल सिमकार्ड निष्क्रिय राहिले.

कोंडाजी निफाडे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या IDBI बँक खात्यातील ₹94,000 गायब असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी पिंपळगाव येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कुटुंब आता संकटात सापडले आहे, आणि तोटा सहन करण्यासाठी धडपडत आहे. निफाडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हे नुकसान आणखीनच भयावह बनले आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती