मुंबईत एका हॉटेल व्यावसायिकाकडून एका न्यायालयीन अधिकाऱ्याने 25 लाख रुपयांची लाच मागितली लाचलुपत प्रतिबंधक ब्युरोने सोमवारी एलटी मार्गावरील एका हॉटेल मध्ये सापळा रचून अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपी अधिकाऱ्याने हॉटेल मालकीचा प्रलंबित प्रश्न आपल्या बाजूने सोडवण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. मला पैसे द्या मी तुमचे काम करतो असे अधिकाऱ्याने म्हटले.