पीडितांच्या म्हणण्यानुसार, चिनी नागरिक लिओ आणि भारतीय नागरिक स्टीव्ह अण्णा यांनी भारतीय मुलींच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार केले आणि क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे कारण दाखवून परदेशी गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
नयानगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, गुन्हे शाखेने नयानगर येथून आरोपींना अटक केली.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.