पुण्यातील दौंड तालुक्यात यवत गावात हिंसाचार उसळला, पोलीस दल सतर्क
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 (16:45 IST)
Pune News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात शुक्रवारी जातीय तणाव पसरला. एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कथित आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यावरून हा वाद सुरू झाला, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येने लोक जमले होते, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दलाला सतर्क ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी गावात सोशलमिडीयावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण झाली. गावकरी रस्त्यावर उतरले आणि काही तरुणांनी इमारतीची तोडफोड केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.