प्रबोधनकार वाचा, मग कळेल विचारधारा- शरद पवार

बुधवार, 27 एप्रिल 2022 (09:03 IST)
"छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा हाच महाराष्ट्राचा आधार आहे. तुम्ही सभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचीच नावे घेता, असे कुण्या एका नेत्याने म्हटले. या नेत्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक परिवर्तनाबाबतचे उत्तम लिखाण वाचावे, म्हणजे असे प्रश्न पडणार नाहीत," असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पवारांवर टीका केली होती.
 
महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या उदघाटन समारंभात बोलत होते. 
 
शरद पवार पुढे म्हणाले, "देशात अनेकांची राज्य होऊन गेली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य हे भोसलेंचे राज्य नव्हते ते रयतेचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यामुळे तीनशे वर्षानंतरही सर्वसामान्यांच्या अंत:करणात स्थान निर्माण करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व, योगदान सांगण्याची गरज नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती