मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार; आणखी एक आरोपी गजाआड

बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:44 IST)
अहमदनगर: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपी संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
 
त्याला पुण्यातून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.
 
या प्रकरणी विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला आरोपी नितीन शिरसाठ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
 
आता भिंगारदिवे याला पुण्यातून अटक केली आहे. बबलू लोंढे व ऋषिकेश शेटे अद्यापही पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपअधीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती