मला सामना कार्यालयात बोलावून धमकावलं आणि २५ लाख रुपये घेतले कंबोज यांचा आरोप

शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (07:26 IST)
भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी मला सामना कार्यालयात बोलावून धमकावलं आणि २५ लाख रुपये घेतले असा आरोप कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत हा आरोप केला आहे.
 
मोहित कंबोज यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, संजय राऊत यांनी २०१४ साली सामनाच्या कार्यालयात मला बोलावून घेतलं आणि धमकवालं. त्यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले आहेत. ते अद्याप परत केलेले नाहीत. यासंदर्भातील पुरावे माझ्याकडे आहेत, मी तक्रार करत आहे, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे गुन्हा दाखल करुन घेणार का? असं कंबोज यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती