राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालावी- प्रकाश आंबेडकर

बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:54 IST)
"राज ठाकरे यांच्या सभेला विरोध कायम आहे, शासनाने सभेवर बंदी घालावी. राज्य सरकार दबावाखाली असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांवरील ईडी व सीबीआयची चौकशी वाचविण्यासाठी राज्य सरकार हा खेळ करीत आहे", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
 
 
"भाजप आणि मनसेची भूमिका हीच राज्य सरकारची भूमिका असल्याची शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात काही तरी घडण्याची शक्यता आहे. 3 मे ला काहीतरी घडणार असे वाटते. परंतु, राज्य सरकारने विरोधी पक्षाच्या बैठकीत काहीही बोलण्याची संधी दिले नसल्याने, आम्ही १ मे ला शांती मार्च राज्यात काढणार आहोत", असेही आंबेडकर म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यासंदर्भात परवानगी दिली आहे. तो आदेश केंद्र सरकारला व इतर राज्य सरकारला लागू आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत भोंग्यासंदर्भात धोरण ठरविण्याबाबत राज्य सरकार हे केंद्र सरकारला आवाहन करणार आहे".
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती