नवनियुक्त पोलिस आयुक्तांचा नाशिककरांना दिलासा; घेतला हा मोठा निर्णय

बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:18 IST)
नाशिकचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिककरांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. गत आयुक्त दीपक पाण्डेय हे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. त्यात त्यांनी घेतलेले विविध निर्णय हे सुद्धा होते. आता नव्या आयुक्तांनी कारभार हाती घेऊन कामकाज सुरू केले आहे. त्यातच पहिला मोठा निर्णय समोर आला आहे.
 
नाशिककरांना आपल्या तक्रारी आता थेट पोलीस आयुक्तांना सांगता येणार आहेत. त्यासाठीच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे आठवड्‌यातील पाच दिवस दररोज एक तास उपलब्ध राहणार आहेत. तशी माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी दिली आहे. दर आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये दररोज ४ ते ५ या वेळेत आयुक्त उपलब्ध असणार आहेत. आगावू वेळ न घेताही पोलीस आयुक्त नाईकनवरे यांना नागरिकांना भेटता येणार आहे. या दरम्यान ते नागरिकांच्या समस्या व सूचना ऐकून कार्यवाही करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या निर्णयाचा मोठा फायदा नाशिककरांना होणार आहे. नागरिक थेट आपली तक्रार आयुक्तांकडे करु शकतात या भीतीपोटीही पोलिस दल अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती