हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा रस्त्याने पंबा येथे रवाना झाला. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर अनेक पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हेलिपॅडवरील खड्ड्यांवरून राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके काढताना दिसले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला उतरवण्याची जागा शेवटच्या क्षणी निश्चित करण्यात आली होती, त्यामुळे मंगळवारी रात्री उशिराच हेलिपॅड बांधण्यात आला. यामुळे हेलिपॅड सुकले नव्हते आणि राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरताच त्याचे वजन जास्त असल्याने ते हेलिपॅडमध्ये अडकले सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.