शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीला भेट देतील अशी अनेक अटकळ बांधली जात आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. खुद्द खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती दिली आहे.
शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे की, उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येण्याचे खास निमंत्रण दिले आहे. या दरम्यान, उद्धव ठाकरे यांना 7 तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे 6, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी दिल्लीत असतील. 7 तारखेला इंडिया ब्लॉकची बैठक होणार आहे. राहुल गांधींनी त्यांना विशेष निमंत्रण दिले आहे आणि उद्धव ठाकरे त्यात सहभागी होणार आहेत."ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही भेटणार आहेत .