पालघरमध्ये निवडणूक प्रचारात पैसे वाटप

Webdunia
शनिवार, 26 मे 2018 (10:53 IST)

पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता पैसे वाटपाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा आणि काही शिवसैनिकांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रानशेत भागातून पैसे वाटप करणाऱ्या काही तरुणांना पकडले. शिवसेनेने या पैसे वाटपामागे पालघर भाजपा शहराध्यक्ष असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हे पैसे मुलांकडे कुठून आले? त्यांना कोणी दिले ? याचा पोलीस तपास करत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख