राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. राजकरणात नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली आहे. राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता येण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई व ठाण्यात दोन्ही भावांनी एकत्रित येण्यासाठी बॅनर्स लागले आहे. मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत युतीसाठी मनसेनेठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार राऊत यांची भेट घेतली. त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.