मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचे रस्ते विकास प्रकल्प सुरू आहे. जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे शहर आणि शिर्डी दरम्यान बांधण्यात येणाऱ्या महामार्गाचा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंत्राटदारांना या प्रकल्पावर टिकून राहता येत नसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसाठी हा प्रकल्प कठीण होत चालला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "कंत्राटदार या प्रकल्पाला का चिकटून राहू शकत नाहीत हे मला समजत नाही. आतापर्यंत तीन निविदा रद्द करण्यात आल्या आहे. त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि त्यांची बँक हमी जप्त केली पाहिजे. आता नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्याचे काम लवकरच सुरू होईल. पण यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला मला आमंत्रित करू नका, कारण आता मला स्वतःला लाज वाटते." असे देखील ते यावेळी म्हणाले.