भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. या लोकांवर सोशल मीडियावर पाकिस्तान झिंदाबाद सारख्या घोषणा आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा आरोप आहे. आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा आहे आणि इतर दोन आरोपी महाराष्ट्रातील पुणे आणि भिवंडी येथील आहे. अशी माहिती समोर आली आहे.
तसेच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, पुण्यात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आणि भिवंडीतील एका तरुणाला शुक्रवारी सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थक संदेश पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली. पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर "पाकिस्तान जिंदाबाद" असे नारे पोस्ट केले होते. तक्रारीनंतर, त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "व अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे," असे पोलिस उपायुक्त यांनी सांगितले.