मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवारी २० लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात मुंबई येथे तैनात असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) सहाय्यक महाव्यवस्थापकासह चार जणांना अटक केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एफसीआय अधिकारी श्रीनिवास राव मैलापल्ली यांच्याव्यतिरिक्त, संघीय तपास संस्थेने एका व्यावसायिका, त्याचा मुलगा आणि एका सहकाऱ्यालाही अटक केली आहे.