गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 64 मंडळांमध्ये मुसळधार पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. मान्सून वेळेपूर्वी आल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.
महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, कोरड्या भागात लागवड आणि पेरण्या उशिरा झाल्या आहेत. आता काही भागात पुढील २-३ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने येत्या 24 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात रेड अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा येथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.