पुढचे 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

शुक्रवार, 13 जून 2025 (16:41 IST)
राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून येत्या 48 तासांत विदर्भात पाऊस कोसळणार आहे.  पपुढील काही दिवस कोकणात पावसाचा रेड अलर्ट , मध्यमहाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट आणि मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे, मेघगर्जने आणि विजांचा कडकडाटासह पाऊस कोसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 
ALSO READ: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील ५ दिवसांसाठी IMD अलर्ट
हवामान खात्यानं कोकणात रायगड, सिंधुदुर्ग भागात अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. 
राज्यात अनेक दिवसांपासून थांबलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार असून येत्या 48 तासांत विदर्भात हजेरी लावणार आहे. तसेच मध्य आणि पश्चिम भारताच्या भागाकडे पुढे सरकणार आहे. 
ALSO READ: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर मध्यमहाराष्ट्रातील पुणे घाट माथा, कोल्हापूर, नाशिक घाट माथा, कोल्हापूर घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, नाशिक घाट माथा, जळगाव, सोलापूर, सातारा, सातारा घाट माथा, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, अमरावती, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, वाशीम या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 
ALSO READ: एमएमआरसाठी एकात्मिक बस परिवहनसेवेसाठी राज्य सरकारने टास्कफोर्स स्थापन केले
तर सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, मुंबई 14 तारखेला, रायगड, 13 , 15 ,16 , कोल्हापूर घाट माथा 13,16 सातारा घाट माथा 13, 14, 16  या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
तर 14 आणि 14 तारखेला रायगड आणि शिंदुदुर्ग साठी रेड अलर्ट जारी केला आहे.  
 
Edited By - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती